दापोली (प्रतिनिधी) - पालगड पंचायत समिती गणात शिवसेना उमेदवार जनार्दन हळदे यांना पंचायत समिती निर्वाचन गणातील गावा गावातील वाडया वस्त्यांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मिळत असलेला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसादाचा कल हा विजयाच्या बाजूने झुकलेला दिसत असल्यामुळे विरोधी उमेदवारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत त्यामुळे ते बॅकफुटवर गेले आहेत. दापोली तालुक्यातील पालगड जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्टया अतिशय महत्वाचा असा गट मानला जातो. अशा या जिल्हा परिषद गटात शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ), महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष एकत्रितपणे लढत आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे पक्षाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अशा या जिल्हा परिषद गटातील पालगड पंचायत समिती निर्वाचन गणाचा विचार करता या पालगड पंचायत समिती गणात आवाशी गावचे सुपुत्र आणि एक यशस्वी उद्योजक जनार्दन शांताराम हळदे हे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची भक्कम साथ आहे. त्यातच जनार्दन हळदे यांचे टांगर पंचक्रोशी परिसरातील गावांसह पालगड पंचायत समिती गणात निस्वार्थी अशा असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या कामामुळे त्यांना प्रत्येक गावात निवडणूक प्रचारादरम्यान मिळणा-या उस्फुर्त प्रतिसादाच्या प्रोत्साहनामुळे त्यांची जनमानसात आणखीनच प्रतिमा लोकप्रिय होत चालली आहे. शिवसेना उमेदवार असलेले जनार्दन हळदे हे शांतताप्रिय आणि सुसंस्कृत असे व्यक्तिमत्व असुन त्यांचा पालगडच नव्हे तर दापोली मंडणगड आणि खेड तालूक्यात असलेला दांडगा लोकसंपर्क प्रशासनातील कामकाजाची असलेली परिपूर्ण माहिती आणि प्रसिध्दिच्या मागे न लागता त्यांनी राजकारणापेक्षा आजवर सामाजिक दायित्वाच्या नात्याने सढळ हस्ते केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, क्रिडा, सांस्कृतिक, धार्मिक आणि आरोग्यविषयक सामाजिक कामाने ते सर्वपरिचित असे व्यक्तिमत्व ठरले आहेत. त्यामुळे पालगड सारख्या राजकीयदृष्टया अतिशय संवेदनशील अशा महत्वाच्या पंचायत समिती गणात त्यांनी निवडणूक प्रचारात घेतलेली आघाडी ही निर्णायक ठरल्याने विजयाच्या बाजूने झुकलेली दिसत आहे. त्याचा प्रत्यय हा निवडणुक प्रचारादरम्यान पाहायला मिळत आहे.
त्यांच्या निवडणूक प्रचारात आवाशी ग्राम पंचायतीच्या सरपंच सुवर्णा शेडगे, उपसरपंच विनोद शेडगे, मंगेश शिंदे, राजाराम शेडगे, कृष्णा शेडगे, इस्माईल मुंडेकर (अल्पसंख्याक मुस्लिम संघटक), बशीर मसुरकर, सचिन शेडगे, राजेंद्र प्रसादे, विजय कदम, महेश चव्हाण, स्वप्निल चाळके, महादेव जाधव, रंजना चाळके, प्रकाश तळवटकर आदींसह मोठ्या संख्येने गावा गावातील शिवसेना, राष्ट्रवादी तसेच मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी सामिल झाले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान हळदे यांना गावागावात वाडीवस्तीत मोठा प्रतिसाद मिळत आहे.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.