loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळणेश्वर जि. प. गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिलांची प्रचारात आघाडी

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिलांची प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वेळणेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धी रामगडे तसेच वेळणेश्वर पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन जाधव व शीर पंचायत समिती गणाचे उमेदवार वकील ज्योत्स्ना काताळकर यांच्या प्रचारासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या पत्नी सुवर्णा जाधव, महिला तालुका प्रमुख सिद्धी सुर्वे, चिपळूण नगर परिषद च्या नगरसेविका कांचन शिंदे यांच्यासह सर्व महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये तसेच वाडी वस्त्यांवर जाऊन उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुवर्णा जाधव यांनी बोलताना सांगितले. आमदार भास्कर जाधव यांनी या भागामध्ये करोडो रुपयांची केलेली विकास कामे येथील जनता नक्कीच विसरू शकणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg