रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने चॅप्टर केस क्रमांक 03/2025 अंतर्गत समीर सोलकर (वय 26, रा. आधिवास बिल्डिंग नं. 4, रूम नं. 2, शेटेवनगर, रत्नागिरी) याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलिस ठाण्याने बी.एन.एस.एस. कलम 141(1)(ख) अन्वये प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधितावर कलम 491 अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, संबंधिताने वारंवार संधी देऊनही नोटीसीला समाधानकारक उत्तर दिले नाही तसेच दंडनीय रक्कम भरण्याबाबत उदासीनता दाखवली.
या प्रकरणात संबंधिताला एकूण 10 वेळा सुनावणीसाठी बोलावण्यात आले असून, त्यापैकी तो केवळ 5 वेळा हजर राहिला. उर्वरित वेळा गैरहजर राहून त्याने कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य केले नाही. दंडनीय रक्कम भरण्यासाठी वारंवार संधी देऊनही कोणतीही रक्कम जमा करण्यात आलेली नाही. तसेच त्याच्या मालकीची कोणतीही जंगम मालमत्ता उपलब्ध न झाल्याने जप्तीची कारवाईही होऊ शकली नाही. अखेर सर्व बाबींचा विचार करून माननीय अपर पोलिस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या आदेशानुसार संबंधितास अंतिम दंडनीय रक्कम भरण्यापर्यंत अथवा एका जामिनदारासह अंतिम बंधपत्र सादर करेपर्यंत तडीपार स्वरूपात मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार समीर सोलकर यास जिल्हा विशेष कारागृह, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे. रत्नागिरी पोलिस दलाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया पुढेही कठोरपणे राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.