loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी जि. प. मध्ये दोन मातब्बर उमेदवारांमध्ये होणार..."कांटे की टक्कर"

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या आणि नव्याने निर्माण झालेल्या शृंगारतळी जिल्हा परिषद या गटाच्या आगामी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत मातब्बर उमेदवारांमध्ये लढत होत असल्याने या ठिकाणी कांटे की टक्कर होणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे सामजसेवेचा वारसा लाभलेले कै. विष्णुपंत पवार यांचे चिरंजीव भाजप-सेना युतीचे उमेदवार आणि गुहागर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांचा आधार असलेले डॉ. राजेंद्र पवार तर दुसरीकडे मनसेचे संपर्क नेते व समाज सेवेची जाण असलेले, गोरगरिबांसाठी सदैव मदतीचा हात पुढे करणारे, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले मनसे शिवसेना उबाठा आघाडीतर्फे उभे असलेले प्रमोद गांधी यांचेमध्ये जोरदारपणे लढत होणार आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी हे सामाजिक कार्याच्या जोरावर घराघरापर्यंत पोहचले आहेत. शुंगारतळी जि. प. गटात एकूण १७५२० मतदार आहेत. यामध्ये ९३२९ महिला तर ८१९१ पुरुष मतदार आहेत. या जि. प. गटात एकूण २६ मतदान केंद्र असून या गटात शृंगारतळी पंचायत समिती तसेच तळवली पंचायत समितीचा गणाचा समावेश आहे. शृंगारतळी पंचायत समितीमध्ये ११ केंद्रात एकूण ७७१७ मतदार तर तळवली पंचायत समिती गणामध्ये १५ केंद्रात ९८०३ मतदार आहेत. शृंगारतळी पंचायत समिती गणामध्ये शृंगारतळी, जानवळे, चिखली, निगुंडळ, पाटपन्हाळे ग्रामपंचायत समावेश आहे, तर तळवली पंचायत समिती गणात तळवली, कारुळ, विसापूर, पांगारी हवेली, परचुरी, वडद, मुंढर, गिमवी, आणि झोंबडी गावांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या जि. प. गटात दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली असून कोण बाजी मारणार हे ७ फेब्रुवारीलाच सिद्ध होणार आहे. या गटाच्या शृंगारतळी गणामध्ये युतीतर्फे शिवसेनेचे युवानेते गौरव वेल्हाळ तर आघाडीतर्फे शिवसेना उबाठाचे माजी सरपंच संजय पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच तळवली पंचायत समिती गणातून युतीतर्फे मंगेश जोशी तर आघाडीतर्फे संदिप धनावडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकंदरीत या जिल्हा परिषद गटामध्ये दोन्ही उमेदवार मातब्बर असल्याने आणि दोघांचेही समाज कार्यामध्ये मोलाचे योगदान असल्याने या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे कुणीही सांगू शकत नाही. मात्र गावागावात, घराघरात, माणसा माणसा माणसात आपुलकीचे नाते तसेच संकटकाळी सदैव मदतीचा हात पुढे करणारे प्रमोद गांधी यांना या गटातील मतदार पक्ष विसरून मतदानाच्या स्वरूपात मदत करतील असा विश्वास सर्वांकडून व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

आगामी निवडणुकीबाबत येथील मनसे आणि शिवसेना उबाठाचे उमेदवार प्रमोद गांधी यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितले की, माझ्यासमोर डॉ. पवार यांच्यासारखे मातब्बर उमेदवार असले तरी आमदार भास्कर जाधव यांची ताकद माझ्याबरोबर आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असून, मी गेली अनेक वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे येथील मतदार मला भरघोस मतांच्या रुपात आशीर्वाद देऊन विजयी करतील असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg