loader
Breaking News
Breaking News
Foto

सासऱ्याच्या मतदारसंघात सूनबाईला उमेदवारी, भांबेड गटात विनिता गांगण यांना वाढता पाठिंबा

लांजा (संतोष कांबळे) - तब्बल ३४ वर्षांपूर्वी ज्या गटातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या ऍड. सदानंद गांगण यांच्या पारंपारिक मतदारसंघात त्यांच्या सुनबाई विनिता विनय गांगण आमदार किरण सामंत यांच्या आशिर्वादामुळे भांबेड गटातून निवडणूक लढवत असून यानिमित्ताने सासरे निवडून आलेल्या ठिकाणी सूनबाई विजयाचा षटकार मारणार का याचीच उत्सुकता आहे. लांजा तालुक्यातील भांबेड जिल्हा परिषद गटात यावेळची निवडणूक अतिशय रंगतदार होईल असे दिसते. या गटात शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे विनिता विनय गांगण यांना उमेदवारी मिळाली आहे. त्या भांबेड ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. त्यांचे पती विनय हे आमदार किरण सामंत यांचे कट्टर समर्थक आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे विनिता या ज्येष्ठ काँग्रेस नेते सदानंद गांगण यांच्या सूनबाई आहेत. सन १९९२ मध्ये ते भांबेड मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. सन १९९२ ते १९९७ पर्यंत सदानंद गांगण काँग्रेस पक्षात मातब्बर नेते गणले जात होते. एकेकाळी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांशी दांडगा संपर्क असलेले सदानंद गांगण मुंबई सोडून गावी आले आणि थेट जिल्हा परिषद सदस्य बनले. जेव्हा जेव्हा विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा तेव्हा सदानंद गांगण यांचे नाव आमदारकीचे उमेदवार वारंवार घेतले गेले. पण पक्षांतर्गत लाथाळ्या व गटबाजी यामुळे त्यांचे नेतृत्व फुलू दिले गेले नाहीत. किंबहुना त्यांचे पाय खेचण्यात काहींनी धन्यता मानली. मात्र तरीसुद्धा त्यांनी कॉग्रेस पक्षातील आपली सक्रियता कायम ठेवली.

टाइम्स स्पेशल

गेली काही वर्षे त्यांचा मुलगा राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे सद्या ते मुलाची राजकीय कारकीर्द बहरताना पाहत आहेत. आता त्यांच्या सुनबाई भांबेडचे मैदान मारण्याच्या तयारी आहेत. आमदार किरण सामंत यांचा त्यांना आशीर्वाद असल्यामुळे पक्षाचे सारे कार्यकर्ते प्रचारासाठी जीवाचे रान करत आहेत. त्यामुळे त्या भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास सदानंद गांगण यांनी रत्नागिरी टाइम्सशी बोलताना व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg