ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलिस आयुक्तालया अंतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ जानेवारी रोजी रास्ता ओलांडताना फिर्यादी महिलेच्या कडेवर असलेल्या एका चिमुकलीचे अपहरण करण्याची घटना घडली होती. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंब्रा पोलिसांनी यांमध्ये पोलिसांनी तब्बल १६०० सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत एक पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. त्यांच्या विरोधात चिमुकलीचे अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल शिंदे यांनी दिली. फिर्यादी फरजाना मोहम्मद फिरोज मन्सुरी, वय २३ वर्षे, रा. ठि. रूम नं ७०२, अजमेरी हाईटस, ठाडीमशीन रोड, सेंटमेरी स्कुल, ७ वा माळा, कौसा, मुंब्रा, ठाणे या घटनेच्या दिवशी २२ जानेवारी रोजी घरी निघाल्या असताना दोन्ही मुलींना कडेवर घेऊन रास्ता ओलांडताना फिर्यादीची मोठी मुलगी अनाबिया ही रडत होती. तर दुसरी मुलगी आफीया खातुन शाहरूख अली(३) ही अनोळखी महिलेच्या जवळ येताच आरोपी महिलेने चिमुकल्या मुलीला माझ्याजवळ द्या मी पण तिकडेच चालली आहे, असे सांगितल्यानंतर फिर्यादी यांनी लहान मुलगी आरोपीकडे दिली. तर महिलेने धूम ठोकली. सदर प्रकारानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा २२ जानेवारी रोजी दाखल केला.
चिमुकलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी गंभीरतेने तपासाला लागले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे चार पथके तयार करून घटनास्थळाची पाहणी करीत पोलीस पथकाने घटनास्थळावरील डीसीबी बँकेच्या समोरील रोडवरील सीसीटीव्ही फुटेज वरून अपहरण करणारी एक बुरखाधारी महिला असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिलेचा मागोवा घेतल्यानंतर सदर आरोपी हि रिक्षामध्ये बसुन मुंब्रा स्टेशनपर्यंत आल्याचे सीसीटीव्ही वरून स्पस्ट झाले मात्र आरोपीने बुरखा परिधान केल्याने बाळ दिसून आले नाही मात्र बाळाच्या पायातील सॉक्स बाहेर आलेला दिसला. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी महिलेच्या पुढील प्रवासाचे सीसीटीव्ही तपासण्याची कसरत पोलिसांना करावी लागली. मुंब्रा ते वांगणी सीसीटीव्ही तापसल्यानंतरही बाळ घेऊन खाली उतरलेल्या बुरखाधारी महिला कुठंही आढळली नाही. त्यामुळे आरोपीच्या माग काढताना मात्र काहीतरी सुटत असल्याचे गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि सावंत व टिम यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंब्रा स्थानकावरील सीसीटीव्हीची बारकाईने तपासणी केल्यानंतर बुरखाधारी महिला प्लेटफ्रॉम नं २ वर उतरताना आणि आणि महिलेची वाट पाहणारा एक पुरुष आरोपी हा आढळला. सोबतच पुरुषा सोबत एक महिलाही आढळली. हे सर्व सीएसटी लोकांमधून गेले. पोलिसांनी ठाणे रेल्वे स्टेशन, नाहूर भांडुप, घाटकोपर, विद्या विहार, कुर्ला रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सदर महिला व पुरुष ठाणे स्टेशन येथे लोकल मधून उतरले असल्याचे व तपासाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्या बाळाला लपेटलेला कपडा हा बदललेला व त्या महिलेने आपले तोंडावरील नकाब बदलले असल्याचे दिसून आले. त्यानंतर सदर महिला व पुरुष हे प्लॅटफॉर्मवर दिसून आले नाहीत.
आरोपींचा प्रवास हा तुटक झाल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर एक पुरुष आणि महिला आढळली नाही. पोलिसांनी तिसऱ्या महिलेवर लक्ष केंद्रित केल्यानंतर महिला मुंब्रा स्थानकावरून रिक्षाने गेली. सदर रिक्षाचा नंबर दिसला नाही. मात्र खबऱ्यांच्या माध्यमातून रिक्षाचा शोध घेतला. पुन्हा महिलेच्या शोधासाठी सीसीटीव्ही तपासण्यात आले. महिला शादी महल हॉल रोड, इन्शानगर येथे आली असल्याचे दिसून आले. परंतु ती कोणत्या बिल्डिंगमध्ये गेली याबाबत काही एक माहिती नव्हती. परंतु स.पो.नि. सावंत व तपास पथकातील कर्मचारी यांचे कौशल्यपूर्ण तपास व तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदार यांच्या मदतीने त्या महिलेस तिच्या घरातून तपासकामी ताब्यात घेतले. त्या महिलेचे नाव नसरीन इकलाख शेख असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासात आरोपी महिलेने दिलेल्या माहितीनुसार बाळ हे अकोला जिल्ह्यात ता.पातूर येथे असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी धाव घेत लहान बाळ व आरोपीत मोहम्मद मुजीब गुलाब (३१) रा. हाजी नगर खेटरी जाय व त्याची पत्नी खैलमिसा मुजीब मोहम्मद(३०) रा. सदर यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी बाळ सुखरूप ताब्यात घेऊन फिर्यादी महिलेला परत दिले.

























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.