loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरात अंतिम दिनी १३ अर्ज मागे, तालुक्यातील लढती कशा होणार? याकडे सर्वांचे लक्ष

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद गटातील ३ तर पंचायत गणातील १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अनेक अपक्ष उमेदवारांनी अंतिम दिनी अर्ज मागे घेतल्याने त्यांची समजूत काढण्यात राजकीय पक्षांच्या वरिष्ठांना यश आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यात ८ गट व १४ गण आहेत. अर्ज माघारी दिनी १३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये दाभोळे गटातील मधुकर साळवी (अपक्ष), कडवई गटातील महेंद्र कापडी (अपक्ष), साडवली गटातील शितल करंबेळे (अपक्ष), धामापूर तर्फे संगमेश्वर गणातील अक्षय चव्हाण (अपक्ष), मामळे गणातील संकेत पंडित (अपक्ष), धामणी गणातील सुजित सुर्वे (आम आदमी पार्टी), साडवली गणातील शितल करंबेळे (अपक्ष), धामणी गणातील अमित ताठरे (अपक्ष), कसबा गणातील अनंत शिगवण (शिवसेना), परचुरी गणातील मधुरा निकम (अपक्ष), माभळे गणातील दिलीप पेंढारी (अपक्ष), निवे बुद्रुक गणातील सुरेश घडशी (अपक्ष), दाभोळे गणातील प्राजक्ता साळवी (शिंदेसेना) यांचा समावेश आहे. धामणी गणातील सुजित सुर्वे यांचे चार दिवसांपूर्वी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या सूचकांनी अर्ज मागे घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोसुंब गटात हायहोल्टेज लढत होणार आहे. शिंदेसेनेचे रोहन बने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत भाजपचे प्रमोद अधटराव यांनी ही मागील निवडणुकीत मोठी मजल मारली होती .ठाकरेसेनेच्या मुग्धा जागुष्टे या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत .या तीनही दिग्गज नेत्यांमध्ये सामना रंगणार आहे. तिन्ही दिग्गज उमेदवार असून ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. याच गटात काँग्रेसकडून चंद्रकांत मोरे हे निवडणूक रिंगणात आहेत. घामापूर तर्फे संगमेश्वर गटात अजित कांबळे (वंचित बहुजन आघाडी), सहदेव बेटकर (ठाकरेसेना), सुशिल भायजे (राष्ट्रवादी अजित पवार गट) व जगन्नाथ राऊत (अपक्ष) हे निवडणूक रिंगणात आहेत. कडवई गटात माजी जि.प. उपाध्यक्ष संतोष थेराडे (ठाकरेसेना), विनोद म्हस्के (भाजपा) व आशिष सुर्वे (काँग्रेस) यांच्यात लढत होणार आहे. कसबा संगमेश्वर गटात विशाखा कुवळेकर (ठाकरेसेना) व रचना महाडीक (शिंदेसेना) यांच्यात थेट लढत होणार आहे: मुचरी गटात माधवी गिते (शिंदेसेना), ललिता तांबे (ठाकरेसेना) व नुपुरा मुळ्ये (अपक्ष) या निवडणूक रिंगणात आहे. साडवली गटाच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. भाजपच्या रुपाली कदम व ठाकरेसेनेच्या नेहा माने यांच्यात थेट लढत होणार आहे. दाभोळे गटात विलास चाळके (शिंदेसेना) व विरश्री बेटकर (वंचित बहुजन आघाडी) एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. धामापूर गणात अजय चव्हाण (ठाकरे सेना), महेश जड्यार (भाजपा), प्रभाकर धनावडे (बळीराज सेना) एकनाथ पवार (बंचित बहुजन आघाडी), आरवली गणात समिता कुंभार (शिवसेना ठाकरे गट), दर्शना गमरे (वंचित बहुजन आघाडी), सुवरे (राष्ट्रवादी धनश्री मेणे (अपक्ष), प्रिया सुवरे ( अजित पवार गट), कडवई गणात मिताली कडवईकर (काँग्रेस), सुचिता कदम (शिंदेसेना), अपर्णा जाधव (ठाकरेसेना), मानसी जाधव (अपक्ष), धामणी गणात चंद्रकांत कदम (काँग्रेस), संतोष भडवळकर (राष्ट्रवादी अजित पवार गट), दत्ताराम लाखन (ठाकरे सेना), कसबा संगमेश्वर गणात संदेश जिमन (अपक्ष), जितेंद्र पेंढारी (अपक्ष), चंद्रकांत फणसे (ठाकरेसेना), सुरेश माईन (शिवसेना शिंदे गट), संजय सुर्वे (काँग्रेस) हे निवडणूक रिंगणात आहेत. परचुरी गणात शिंदे सेनेच्या शर्वरी वेल्वे व ठाकरे गटाच्या पूजा शितप यांच्यात सामना रंगणार आहे. माभळे गणात देखील दिलीप गिते ठाकरे सेना आणि सुहास मायंगडे शिंदे सेना यांच्या लढत होणार आहे. मुचरी गणात प्रज्ञा गमरे (ठाकरेसेना), आरूषी घवाळी (राष्ट्रवादी अजित पवार गट), माधुरी धामणे (अपक्ष) याः निवडणूक रिंगणात आहेत.

टाइम्स स्पेशल

कोसुंब गणात तबस्सुम खाचे (अपक्ष), दुर्वा पाष्टे (भाजपा) व सुहासिनी भातडे (ठाकरेसेना), निवे बुद्रुक गणात सुरेश गुरव (ठाकरेसेना) व प्रफुल्लचंद्र बाईत (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांच्यात लढत होणार आहे. साडवली गणात ठाकरेसेनेच्या क्षमा जाधव विरुद्ध शिंदे गटाच्या तृप्ती मांगले यांच्यात सामना रंगणार आहे. हातीय गणात प्रदीप ढवळ (ठाकरेसेना) व मंगेश बांडागळे (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. दाभोळे गणात सुप्रिया कांबळे (वंचित बहुजन आघाडी), दिपाली जाधव (शिंदेसेना) व अपेक्षा दाभोळकर (अपक्ष) या निवडणूक रिंगणात, कोंडगाव गणात विद्यासागर तांदळे (ठाकरेसेना), दिलीप बेर्डे (काँग्रेस) व शिंदेसेनेकडून माजी सभापती जयसिंग माने निवडणूक रिंगणात आहेत. दाभोळे जिल्हा परिषद गटात विलास चाळके यांना ही निवडणूक आमदार भैय्या सामंत यांच्या विकास कामांच्या धडाक्याने व नेतृत्वाने सोपी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे .तर कोसुंब गटात अटीतटीची लढत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg