सूनेवरच्या रागातून सास-याने सुरीने वार करुन हत्या करणा-या सास-यास जन्मठेप ची सजा दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील एका इसमास झाली आहे. दि. २९/०३/२०२२ रोजी दापोली पोलीस स्टेशन गु.र.नं. ५४/२०२२, सेशन केस नं. २१/२०२२ या गुन्हयांमध्ये आरोपी मधुकर धोंडू सणस, वय ६२ वर्षे, रा. टाळसुरे, आष्टाची वाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांस खेड येथील न्यायालयाने (जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश साो. पी. एस. चांदगुडे) यांनी भा.द. वि. कलम ३०२ प्रमाणे दोषी धरणेत आलेले आहे. दिनांक २८/०१/२०२६ सदर गुन्हाचे कामी निकाल होवून आरोपी यांस भा.द.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व रु. ५०००/- दंड, तसेच दंड न भरल्यास भा.द.वि. ३०२ कलमासाठी ६ महिने सक्षम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
थोडक्यात हकिकत अशी की, यातील आरोपी मधुकर धोंडू सणस, वय ६२ वर्षे, रा. टाळसुरे, आष्टाची वाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी व मयत आरती अभिषेक सणस, वय-३२ वर्षे, रा. टाळसुरे, आष्टाची वाडी, ता. दापोली हे नात्याने सासरे-सून आहेत. आरोपी मयत हिचेवरघरगुती कारणावरुन राग धरुन वरचेवर वाद करीत होते. आरोपीची सून मयत आरती ही आशा सेविका म्हणून कोव्हिड काळात काम करीत होती याचा आरोपी यास राग होता. दिनांक २९/०३/२०२२ रोजी १३.०० वा. चे सुमारास यातील आरोपी मधुकर सणस यांनी सून आरती हिचेवरच्या रागातून घरात असणारी सुरी घेवून तिला धार काढून त्या सुरीने सून आरती सणस हिचे पाठीमागून गळयाचे खाली, हनुवटीने खाली, कमरेवर व पाठीवर उजवे बाजूस, बरगडीजवळ, गंभीर वार करुन जिवे ठार मारले व त्यास सुरीने स्वतःचे गळयावर गंभीर जखम करुन घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून आरोपी मधुकर धोंडू सणस याचेविरुध्द भा.द. वि. कलम ३०२, ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण १७ साक्षीदार तपासणेत आले. सदरकामी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल तसेच परिस्थितीजन्य जागेवर सापडलेला पुरावा, साक्षीदारांनी दिलेली साक्ष, पोस्टमार्टम रिपोर्ट या सर्व गोष्टीचा मे. कोर्टाने साकल्याने विचार करुन आरोपींच्या विरुध्द गुन्हा सिध्द झाला असल्याचे जाहीर केले. सदर प्रकरणी सरकारी वकील अॅड. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार विवेक अहिरे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे दापोली तसेच कोर्ट पैरवी पोलीस हवालदार सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस शिपाई ४०० कासार यांचे अनमोल सहकार्य लाभले.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.