loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रवासी संघ नि:स्वार्थपणे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कार्यरत : संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी)- प्रवाशांना न्याय मिळवून देण्याचे काम कणकवली तालुका प्रवासी संघटना करीत आहे. प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संघ संविधानिक आयुधांचा वापर करून लढा देत आहे. राजकीय क्षेत्रातील मंडळी राजकीय फायदा पाहून समाजात काम करीत असतात. मात्र, प्रवासी संघ हा नि:स्वार्थपणे जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कार्यरत आहे. प्रवाशांना हक्क, सोयीसुविधा मिळाव्यासाठी प्रवासी संघटना जागृत आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. राष्ट्रीय प्रवासी दिनाचे औचित्य साधून कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नऊ मान्यवरांचा गौरव सोहळा नगरवाचनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केला होता. या प्रसंगी पारकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कणकवलीचे अध्यक्ष राजस रेगे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, नगरसेवक संकेत नाईक, श्रद्धा कदम, सुगंधा देवरुखकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संदेश पारकर म्हणाले, प्रवाशांचे प्रश्न, अचडणी, समस्यांना वाचा फोडण्याचे काम प्रवासी संघाच्या माध्यमातून गेले कित्येक वर्षे सुरू आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागत प्रवासी संघातर्फे दरवर्षी केले जाते. सरकारी व्यवस्थेवर अंकुश ठेवून संघ प्रवाशांना न्याय मिळवून देत आहे. मनोहर पालयेकर यांच्या नेतृत्वाखाली टीम नि:स्वार्थ हेतून जनसेवा करीत आहे. प्रवाशांचे हक्क व त्यांना मिळणाºया सोयीसुविधा मिळावेत, यासाठी हा संघ काम करीत आहे. कणकवली शहराला आदर्श शहर बनविण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीत असून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रासाठी लवकरच जागा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजेश रेगे म्हणाले, एसटी स्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळावर प्रवाशांना तिकिट काढण्यासाठी तासन्तास उभे रहावे लागते. याठिकाणी प्रवाशांना तासन्तास उभे न राहता सहजरित्या तिकिट मिळावे, यासाठी प्रवास संघटना संविधानिक आयुधांचा वापर करून लढा देत आहे. परंतु संबंधित यंत्रणांनी प्रवाशांना सुलभरित्या तिकिट मिळण्यासाठी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टाइम्स स्पेशल

प्रास्ताविकात मनोहर पालयेकर यांनी संघाचा आढावा घेत संघाच्या कार्याची माहिती दिली. संघातर्फे भटक्या विमु्क्त समाज निवासी आश्रम शाळा, बोर्डवेचे आनंद कर्पे, गतिमंद मुलांची निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी सोगम, रुग्णवाहिका चालक श्रीधर सावंत, शववाहिका चालक उत्तम पुजारे, भजन मंडळ, सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे, पत्रकार वीरेंद्र चिंदरकर, वाहतूक पोलीस दिलीप पाटील, एसटी चालक श्रीराम लाड यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन संदीप राणे यांनी केले. आभार रमेश जोगळे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg