loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरवण मेढे परिसरात आढळला अस्वलांचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

तिलारी (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील तेरवणमेढे आणि तिलारी परिसरातील गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, आता या भागात अस्वलांचे दर्शन घडू लागल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून हत्ती आणि वाघाच्या वावरामुळे त्रस्त असलेल्या मेढेवासीयांसमोर आता अस्वलांच्या रूपाने नवीन संकट उभे ठाकले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मेढे गाव आणि लगतच्या वनक्षेत्रात यापूर्वी हत्तींनी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यानंतर या भागात वाघाचा वावर असल्याचेही समोर आले होते. हे संकट ताजे असतानाच, आता भरवस्तीत आणि शेतशिवारात अस्वले दिसून आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अस्वलांच्या या वाढत्या वावरामुळे सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडणे किंवा बागायतीमध्ये कामाला जाणे धोक्याचे झाले आहे. अस्वलांच्या दर्शनामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तेरवणमेढे गावातील ग्रामस्थ करत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg