loader
Breaking News
Breaking News
Foto

PFAS रसायनप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल; MPCB व केंद्र सरकारकडून 2 आठवड्यांत अहवाल मागवला

दापोली (चंद्रशेखर जोशी) : इटलीतील मिटेनी (Miteni) या संस्थेच्या PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) रसायननिर्मिती उपकरणांचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत स्थलांतर व पुनर्स्थापना केल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) दखल घेतली आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिकांच्या आरोग्य व जीवनाच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आयोगाने नोंदवला आहे. 12 जानेवारी 2026 रोजी प्राप्त तक्रारीवर 16 जानेवारी 2026 रोजी सुनावणी करत आयोगाचे सदस्य श्री. प्रियंक कानुंगो यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993 च्या कलम 12 अंतर्गत प्रकरणाची दखल घेतली. आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अध्यक्ष तसेच केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सचिवांना नोटीस बजावून या आरोपांची चौकशी करून दोन आठवड्यांत Action Taken Report (ATR) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारदाराने इटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय हानीस कारणीभूत ठरलेल्या PFAS रसायननिर्मिती उपकरणांचा भारतात वापर होत असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. PFAS रसायने मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून कर्करोग, हार्मोनल बिघाड व दीर्घकालीन आजारांचा धोका वाढवतात, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. डोंबिवली व तळोजा यांसारख्या रासायनिक औद्योगिक पट्ट्यांतील पूर्वीच्या दुर्लक्षाचे उदाहरण देत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, या विषयावर MPCB व स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्वतंत्र तज्ज्ञांकडून चौकशी, राज्य व केंद्र सरकारकडून कडक पर्यावरणीय देखरेख आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याची मागणी तक्रारदाराने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली होती. आयोगाने संबंधित प्राधिकरणांना अहवाल HRCNet पोर्टलद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले असून ई-मेलद्वारे पाठवलेले अहवाल ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, येणाऱ्या अहवालानंतर पुढील कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

टाइम्स स्पेशल

लोटे येथील वादग्रस्त कंपनीने Forever Chemicals विषारी उत्पादने करणारा इटालियन प्लांट लोटे परशुराम येथे आणून सुरू केल्यानंतर सध्या देशभर यावरून मोठी चिंता पसरली आहे आणि वादंग सुरू आहे. मूळच्या मुर्डी येथील आणि सध्या पुणे येथे उच्चपदस्थ कॉर्पोरेट अधिकारी मुक्ता भातखंडे जोशी यांनी यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती त्याबद्दल आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस जारी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg