loader
Breaking News
Breaking News
Foto

संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध

गुहागर /गुहागर तालुक्यातील अंजनवेल विधानसभा मतदारसंघात असगोली जिल्हा परिषद गटातून शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपा ओबीसी जिल्हा सेल चे अध्यक्ष आणि नुकतेच शिवसेना पक्षात प्रवेश केलेले संतोष जैतापकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक चुरसीची केली. अशातच आज निवडणूक अर्जांच्या छाननी प्रक्रियेच्या वेळी विक्रांत जाधव यांनी जैतापकर यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत नोंदवून त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिले. त्यामुळे शिवसेना गटांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. संध्याकाळी ४ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर या हरकत अर्जाची कायदेशीर सुनावणी घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विक्रांत जाधव यांनी त्यांची बाजू व हरकतीचे मुद्दे मांडताना जैतापकर यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रात खाडाखोड केली आहे आणि संपत्ती च्या वर्णनामध्ये विगतवारी केलेली नाही तसेच त्यांच्यावर असलेल्या प्रलंबित केस संदर्भात खरी माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली नाही असे मुद्दे मांडले. संतोष जैतापकर यांच्या वतीने सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. संकेत साळवी यांनी लेखी म्हणणे सादर करून युक्तिवाद केला. ॲड. संकेत साळवी यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे काही महत्त्वाचे निर्णय सादर करून तांत्रिक मुद्द्यावर उमेदवाराचा अर्ज नाकारता येणार नाही , तसेच निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या फॉरमॅट मध्येच जैतापकर यांनी माहिती नमूद केली आहे तसेच प्रलंबित केस च्या संदर्भात कोणतीही माहिती लपवलेली नसून त्यांच्या विरुद्ध दाखल असलेली केस ही नाममात्र स्वरुपाची आहे असे महत्वाचे मुद्दे उपस्थित केले.

टाइम्स स्पेशल

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संध्याकाळी उशिरा निकाल जाहीर करत संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. या केसच्या सुनावणी दरम्यान ॲड. संकेत साळवी याना ॲड.अलंकार विखारे, ॲड.सुप्रिया वाघधरे, ॲड.सुशील अवेरे, ॲड.मानसी सोमण, ॲड.रोशनी पवार यांनी सहकार्य केले. या निकालामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण असून या जिल्हा परिषद गटाची निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg