loader
Breaking News
Breaking News
Foto

​माजगावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार; भाजप उमेदवार विक्रांत सावंत यांचा निर्धार

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : "वडील विकासभाईंच्या निधनानंतर माजगाववासीयांनी कुटुंबासारखा धीर दिला. आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतरही तुम्ही दिलेले आशीर्वाद पाहून मला मोठा आधार वाटत आहे. माजगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वांना सोबत घेऊन काम करेन," असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला. माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्यावतीने विक्रांत सावंत, रूपेश बिर्जे यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी माजगाव येथील श्री देव महादेव आणि श्री देवी सातेरी मंदिरात श्रीफळ ठेवून देवाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​प्रचाराच्या सुरुवातीला ग्रामस्थांशी संवाद साधताना विक्रांत सावंत म्हणाले की, "हा केवळ प्रचाराचा शुभारंभ नसून गावाच्या विकासाचा शुभारंभ आहे. कै. भाईसाहेब सावंत आणि स्व. विकास सावंत यांचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे." माजगाव, सोनुर्ली, वेत्ये, चराठे, ओटवणे आणि सरमळे या सर्व गावांतील ग्रामस्थ आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. देवतांचे दर्शन घेतल्यानंतर विक्रांत सावंत यांनी कार्यकर्त्यांसह मतदारसंघात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

टाईम्स स्पेशल

​या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, शिवसेना नेते अशोक दळवी, पंचायत समिती उमेदवार सचिन बिर्जे, माजगाव सरपंच रिचर्ड डिमेलो, आर. के. सावंत, सुरेश सावंत, संजय कानसे, ॲड. शामराव सावंत, सी. एल. नाईक, चंद्रकांत सावंत, अमोल सावंत, प्रा. बाळासाहेब नंदिहळ्ळी, अखिलेश कानसे, पी. ए. सावंत, गवंडी, शुभम रेडकर, ऋतिक कोरगावकर यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg