loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी , राज्याचे लक्ष्य

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुचर्चित प्रकरणांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा वाद, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ‘घड्याळ’ चिन्हाचा वाद या दोन्ही प्रकरणांवर एकत्रित सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. या सुनावणीसोबतच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या निर्णयाविरोधात सुनील प्रभू यांनी दाखल केलेली याचिका, तसेच अजित पवार गटातील आमदारांना अपात्र न केल्याच्या निर्णयाविरोधात जयंत पाटील यांनी दाखल केलेली याचिका यावरही आजच सुनावणी होणार आहे. याशिवाय, नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरण देखील आजच्या कामकाजात समाविष्ट आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजाच्या यादीत ही प्रकरणे अनुक्रमांक 37 आणि 38 वर नमूद करण्यात आली असून, ही सर्व प्रकरणे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ऐकली जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने याआधीच 12 नोव्हेंबर रोजी या पाचही प्रकरणांच्या एकत्रित सुनावणीसाठी सहा तासांचा वेळ निश्चित केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण होऊन निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नाव व चिन्हांवरील अंतिम निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर, सत्तासमीकरणांवर तसेच आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg