loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण पुनर्रचना विशेष निवासी शिबिर

खेड : श्रीमान चंदुलाल शेठ हाय व ज्युनिअर कॉलेज खेड येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण पुनर्रचना विशेष निवासी शिबिर मौजे भडगाव खोंडे येथे संपन्न झाले. सात दिवसांच्या विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी राजेश बुटाला चेअरमन प्रशाला समिती, नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, संजय मोदी, पंकजभाई शहा, संजय बुटाला, उत्तम कुमार जैन, आनंद कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच दिपक पदुमले, बाबाराम बैकर, वसंत पवार, विलास भोसले, नाईक सहदेव पवार, ह.भ.प. विष्णू जोगळे, ह.भ.प. शशिकांत जोगळे, अनंत लाले, सुनीलशेठ रेवाळे, चंद्रकांत पवार, संदीप घरवी, रविंद्र जोगळे, दगडू गावडे तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रीय सेवा योजना ’नॉट मी बट यू ’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करण्याची प्रेरणा देणारी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाची प्रभावी चळवळ आहे. शिक्षणाबरोबर समाजभान, राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वयंसेवी भावना विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याचे महत्वपूर्ण कार्य एनएसएसच्या माध्यमातून केले जाते. शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. प्रभारी मुख्याध्यापक मस्के , पर्यवेक्षक कांबळे, ज्येष्ठ शिक्षक राठोड, संयोजक पाटील, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत पाटील, कमळकर, संपदा काळे, मांडे, बाईत, सहदेव पवार, भुसारे, सौ. करमरकर तसेच सहजीवन शिक्षण संस्था पदाधिकारी व नियामक समिती व या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेले सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg