loader
Breaking News
Breaking News
Foto

भिरवंडे श्री देव रामेश्वर मंदिरात रविवारपासून अखंड हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) - भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शुद्ध रथसप्तमी पासून म्हणजेच रविवार २५ जानेवारी ते रविवार १ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरिनाम सप्ताहामुळे रविवारपासून संपूर्ण भिरवंडे गाव भक्तीरसात न्हावून निघणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सप्ताहानिमित्त होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे- २५ जानेवारी रात्री ९.३० वा. संगीत भजन, बुवा कुणाल परब (टेवणाई प्रा.भजन मंडळ बाल कलाकार तरंदळे). २६ जाने. दु. १२.३० वा. महिला भजन- बुवा अंकिता गावडे (अष्टविनायक महिला भजन मंडळ, साळेल-मालवण), रात्री ९.३० वा. भजन- बुवा मिलिंद लाड (बालमित्र प्रा. मंडळ फोंडाघाट), रात्री १०.३० वा. चित्ररथ - वादळ मेस्त्री (रामेश्वर माऊली वशिक रंगीत दिंडी, नाटळ). २७ जाने.- दु. १ वा. महिला भजन- बुवा रिया मेस्त्री (स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ लोरे नं. १), रात्री ९.३० वा. भजन-बुवा वैभव नाणचे (मेजारेश्वर भजन मंडळ नागवे). २८ जाने. दु. १२.३० वा. दिंडी भजन- बुवा निलेश परब (महालक्ष्मी दिंडी भजन मंडळ, नांदगाव), रात्री ९.३० वा. भजन - बुवा शशिकांत राणे (बाबा भालचंद्र भजन मंडळ जाणवली), रात्री १०.३० वा. भजन - बुवा ॠषिकेश मेस्त्री (परब्रह्म संगीत भजन मंडळ, नांदगाव), रात्री ११ वा. चित्ररथ (जि.प. प्राथमिक शाळा हरकुळ खुर्द गावडेवाडी).

टाईम्स स्पेशल

२९ जाने. एकादशी महोत्सव - दु. १२.३० वा. भावगीत, सुगमसंगीत (श्री सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी), रात्री १० वा. भजन सम्राट बुवा श्रीधर मुणगेकर, मुंबई, रात्री ११.३० वा. बालदिंडी चित्ररथ (केंद्रशाळा भिरवंडे नं. १). ३० जाने. दु. १२.३० वा. महिला भजन- बुवा दिव्या गोसावी (आदिनाथ सिद्ध महापुरूष भजन मंडळ जाणवली), रात्री ९.३० वा. संगीत भजन बुवा अमेय आर्डेकर (नागेश्वर भजन मंडळ नागवे), रात्री १०.३० वा. चित्ररथ (जि.प. शाळा भिरवंडे खलांतर नं. २). ३१ जाने. दु. १२.३० महिला भजन - बुवा सौ. ॠतुजा पाळेकर-सावंत (भूतनाथ महिला भजन मंडळ घोणसरी), सायं. ७ वा. संगीत भजन- बुवा सचिन राणे (लिंगेश्वर पावणाई भजन मंडळ वाघेरी), रात्री ८.३० वा. संगीत भजन- बुवा प्रशांत सावंत मुंबई (ईस्वटी ब्राह्मण भजन मंडळ कुंभवडे), रात्री ९.३० वा. संगीत भजन- बुवा उदय राणे (राधाकृष्ण भजन मंडळ जाणवली) रात्री १० वा. वारकरी दिंडी भजन (माऊली वारकरी दिंडी भजन मोर्ये, देवगड), रात्री ११ वा. चित्ररथ (माध्यमिक विद्यामंदिर कनेडी). तरी या हरिनाम सप्ताहाचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवालये संचालक मंडळ, भिरवंडे व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg