loader
Breaking News
Breaking News
Foto

पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलचा सन्मान

मालवण (प्रतिनिधी) - हरित सेना योजनेअंतर्गत पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सामाजिक वनीकरण विभाग, सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल या प्रशालेस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ओरोस येथे सामाजिक वनीकरण विभाग, सिंधुदुर्गचे विभागीय वनअधिकारी श्री. राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांना सन्मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचलित श्री शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेने गेली अनेक वर्ष प्रशालेत समाजोपयोगी विविध उपक्रम सुरू आहेत. चालू वर्षात प्रशालेत २००० सागाच्या रोपांची नर्सरीची निर्मिती करण्यात आली. त्याचप्रमाणे १००० रक्तचंदन रोपांच्या नर्सरीची निर्मिती करण्यात आली. गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून वनराई बंधारा बांधण्यात आला. इत्यादी अनेक उपक्रम शाळेने चालू वर्षात राबविल्यामुळे त्याचप्रमाणे प्रशालेत गेली अनेक वर्षे खाजगी कंपन्यांकडून निधी उपलब्ध करून मोफत रोपवाटप करून परिसर हरितमय करण्याचे कार्य सुरु आहे.

टाइम्स स्पेशल

हरित सेनेने प्रशालेच्या कार्याची नोंद घेत प्रशालेचा विशेष सन्मान केला .याप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी वर्षा कोळेकर, प्रशाळेच्या हरीत सेना शिक्षिका प्रतिभा केळूसकर, हरितसेना पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या शाळेतील शिक्षक, आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg