loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शिरोडा नाका परिसरात अचानक आग लागल्याची घटना

सावंतवाडी - शहरातील शिरोडा नाका परिसरात मराठा हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या गवताला सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. वाळलेले गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र नागरिकांनी तात्काळ नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी बोलविल्याने आगिवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळाले. घटनास्थळी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी धाव घेतली वस्तुस्थितीची पाहणी केली. शिरोडा नाका येथिल मराठा हॉस्टेलच्या नजिक असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सायंकाळच्या सुमारास त्या गवतामधून अचानक आग लागल्याने आगीने क्षणाधार्थ रौद्र रूप धरण केले. हा प्रकार पाहून तेथील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिसरात घरे असल्याने ग्रामस्थांनी खबरदारी घेत तात्काळ पालिकेच्या अग्निशमन बंबाला घटनास्थळी पाचारण केले. बंब दाखल होतास नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी पाण्याच्या साह्याने आग विझविण्यात यश मिळवले. मात्र झालेल्या प्रकारामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली होती. आग नेमकी कशामुळे लागली हे समजून शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक गोंदावले यांनी घटनास्थळी येत वस्तुस्थितीची माहिती घेतली, तसेच नागरिकांना धीर दिला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg