loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात भाजपची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत पूर्ण ताकदीने मैदानात

खेड (प्रतिनिधी) – कोकण विभागात भारतीय जनता पार्टीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असून संपूर्ण महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजप अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत होत असून या घडामोडींमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चैतन्यमय झाले आहे, असे प्रतिपादन भाजप नेते वैभव खेडेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला मिळालेले अभूतपूर्व यश आणि मुंबईत भाजपचा महापौर विराजमान होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पक्षाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या राजकीय घडामोडींचा प्रभाव कोकणासह ग्रामीण भागातही स्पष्टपणे जाणवत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उतरणार असून या निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खेड तालुक्यातील सर्व पंचायत समिती गणांमध्ये भाजप आपले अधिकृत उमेदवार उभे करत असून जिल्हा परिषदेच्या काही जागांवर वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या आदेशानुसार उमेदवार देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टाइम्स स्पेशल

या निवडणुकीसाठी भाजपने सर्वांगीण तयारी केली असून पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले आहेत. संघटनात्मक ताकद, विकासाचा अजेंडा आणि जनतेचा वाढता पाठिंबा याच्या जोरावर येत्या पाच तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला पाहायला मिळेल, असा ठाम विश्वास भाजप नेते वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg