loader
Breaking News
Breaking News
Foto

अजितदादांच्या निधनाने मन सुन्न झाले; त्यांच्या मार्गदर्शनाची उणीव कायम भासेल – राज्यमंत्री योगेश कदम

खेड (प्रतिनिधी) - अजित दादांच्या निधनाने आपण अजूनही धक्क्यात असून ही घटना स्वीकारणे कठीण जात असल्याची भावना राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे. दादांसारखी व्यक्ती आज आपल्या सोबत नाही, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात प्रवेश केल्यापासून, आमदार नसताना शिवसेना पक्षात काम करत असतानाही आपण अजित दादांकडे नेहमीच आदर्श नेतृत्व म्हणून पाहत आलो, असे योगेश कदम यांनी नमूद केले. अजित दादांची कार्यपद्धती, कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्याची त्यांची खास शैली आणि संघटन कौशल्य राज्यात दुर्मीळ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार होण्याआधी वडिलांच्या माध्यमातून अनेक वेळा अजित दादांची भेट झाली. त्यानंतर आमदार व विशेषतः मंत्री झाल्यानंतर, मंत्रिपदाचा उपयोग जनतेला न्याय देण्यासाठी आणि जनसेवेसाठी कसा करायचा, याचे महत्त्वपूर्ण धडे आपण अजित दादांकडून प्रत्यक्ष शिकलो, असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कामाचा पाठपुरावा, प्रशासनावर आवश्यक ती पकड आणि लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया याबाबत अजित दादांचे मार्गदर्शन ही आपल्या राजकीय कारकिर्दीतील मोठी शिदोरी असल्याचे योगेश कदम म्हणाले. ही दुःखद बातमी समजताच मन सुन्न झाले आणि आजही त्या वेदनेतून बाहेर पडता आलेले नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अजित दादांचे निधन ही केवळ त्यांच्या कुटुंबाची किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हानी नसून, महाराष्ट्रातील युवक आणि सर्वसामान्य जनतेसाठी ही एक अपूरणीय हानी असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

टाइम्स स्पेशल

त्यांच्या कार्याला कुठलीही तोड नसून, त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, असेही त्यांनी सांगितले. या कठीण प्रसंगी आपण अजित दादांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आणि दुःखी कार्यकर्त्यांसोबत ठामपणे उभे असल्याचे सांगत, आई जगदंबा यांनी सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg