loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर भगिनी मंडळ संचलित शिशुविहारमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

राजापूर : येथील राजापूर भगिनी मंडळ संचलित शिशुविहारमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेत आज कार्यकारिणी सदस्या, सभासद, शिशु विहार कर्मचारी, विद्यार्थी,पालक यांच्या समवेत ध्वजारोहण करून खाऊ वाटप झाले. त्यानंतर राजीव गांधी मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. तेथे शिशुविहारच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्वाती बोटले यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. श्वेता आंबेकर, सेक्रेटरी डॉ.सौ. तृप्ती पाध्ये, उपसेक्रेटरी सौ. यशोधरा पाटणकर, शिशु विहार उपव्यवस्थापिका सौ. श्रृती ताम्हनकर, सदस्या सौ. संपदा सरखोत,सौ. गौरी अभ्यंकर,शाळेच्या लाडक्या माजी शिक्षिका आणि सभासद सौ. मानसी नवरे , मंडळाच्या सभासद आणि माजी उपाध्यक्षा सौ. शिल्पा मराठे, सभासद श्रीमती पुष्पा साने, मुख्याध्यापिका सौ. अनन्या करंबेळकर , शिक्षिका सौ. स्वरा ठाकूर , मोहिते बाई, मदतनीस आणि माजी मदतनीस संगीता तसेच पालकवर्ग यांची उपस्थिती होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg