loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील फॅब्रिकेशन व्यावसायिक केदार जोशी यांची आत्महत्या

रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील जोशी पाळंद येथे आज सकाळी केदार श्रीकृष्ण जोशी वय ५१ यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेने परिसरात दुःखद छटा पसरली. केदार जोशी यांनी आत्महत्या का केली असावी? याचे कारण अद्याप उघड झालेले नाही. सकाळच्यावेळी बंद रुममध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचे काही वेळेनंतर कुटुंबियांच्या निदर्शनास आले. केदार जोशी हे विवाहीत असून फॅब्रिकेशन व्यवसायात होते. तसेच ते सुसंस्कारीत असल्याने समाजात त्यांच्याविषयी चांगली व्यक्ती म्हणून ओळख होती. त्यांनी अचानक टोकाचा निर्णय का घेतला? असे कोणते संकट त्यांच्यासमोर उभे होते? कुणाशी त्यांचा वाद झाला होता का? याबाबतचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg