loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी येथे वडापाव विक्री करणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या अनेक वर्षांपासून साटेली भेडशी मधला बाजार येथे वडापाव चहा विक्री करणाऱ्या झरे काजुळवाडी, धनगरवाडी, येथील रहिवासी असलेल्या दिपक विठ्ठल खरवत (वय वर्षे ३५) या तरूणाने सासोली भरपाल सीमेवर तिलारी धरणाच्या उजव्या कालव्याच्या ठिकाणी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. धंदा सुरळीत चालू होता, मग त्याने टोकाचे पाऊल का? उचलले हे समजत नाही. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणून नंतर नातेवाईक यांच्या ताब्यात दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिपक विठ्ठल खरवत हा युवक साटेली भेडशी येथे काकाचा वडापाव चहा विक्री स्टाॅल चालवत होता. या ठिकाणी चांगली गर्दी असायची लोक रांगेत थांबून खात होते. शिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होते. दिपक खरवत हा बायकोच्या केस संदर्भात मंगळवारी जिल्हा न्यायालयात गेला होता. या नंतर त्याच्या गाडीला अपघात होऊन किरकोळ मार लागला होता. याची माहिती त्याने घरी कळविली होती. नातेवाईक गेले होते. या नंतर आपण येतो तुम्ही चला असे सांगितले. मंगळवारी सायंकाळी त्याचा फोन बंद येऊ लागला. नातेवाईक व मिञ फोन करत होते पण राञी उशिरा पर्यंत बंद होता. राञी उशिरा फोन चालू झाला अनेक मेसेज केले, पण त्याने फोन घेतले नाही. गळफास लावून घेण्यासाठी उजेडासाठी त्याने मोबाईल बॅटरी सुरू केली. झाडाला दोरीने गळफास लावून घेतला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg