loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्धव ठाकरेंनी पवार कुटुंबीयांची भेट घेत व्यक्त केला शोक; दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बारामती येथे पवार कुटुंबीयांची भेट घेतली. अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि या दु:खातून सावरण्याची शक्ती देण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्धव ठाकरे सकाळी बारामतीत दाखल झाले. थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. काही काळ त्यांनी कुटुंबीयांशी एकांतात संवाद साधत त्यांच्या दु:खात सहभागी होत धीर दिला. यावेळी उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “महाराष्ट्राने आज एक आक्रमक, कर्तृत्ववान आणि जनतेशी नाळ जोडणारा नेता गमावला आहे. अजित पवार यांचे जाणे ही राज्यासाठी कधीही न भरून न येणारी हानी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टाइम्स स्पेशल

पवार कुटुंबीयांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. बारामतीतील निवासस्थानी दिवसभर विविध पक्षांचे नेते, मंत्री, आमदार, खासदार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत असून, अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाने राजकीय मतभेद विसरून सर्वच पक्षांचे नेते बारामतीत येत आहेत. उद्धव ठाकरे यांची ही भेट केवळ औपचारिक नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या नेतृत्वाच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव करून देणारी ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg