खेड (प्रतिनिधी) - खेड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, खेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २०२६ च्या भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, खेड यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नवीन गोळीबार मैदान, खेड येथे रविवार दिनांक २५ जानेवारी ते सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ या कालावधीत ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तालुक्यातील विविध सहकारी पतसंस्थांच्या संघांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान श्री मुरली मनोहर पतसंस्थेच्या संघाने संघभावना, शिस्तबद्ध खेळ आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.
साखळी सामने, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यापर्यंत संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत दमदार आव्हान उभे केले. अंतिम सामन्यात जरी विजेतेपद थोडक्यात हुकले असले, तरी उपविजेतेपद मिळवत संघाने आपली गुणवत्ता सिद्ध केली. या यशामुळे पतसंस्थेच्या पदाधिकारी, कर्मचारी, सभासद तसेच खेड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, खेड यांच्या संघावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातील स्पर्धांसाठीही संघाकडून आणखी उज्वल कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.