loader
Breaking News
Breaking News
Foto

वायंगणतड जेसीबी अपघातानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; धुळीचे लोट आणि धोकादायक खडीमुळे नागरिक त्रस्त

तिलारी (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील वायंगणतड येथे वेळपई पुलाजवळ रस्ता दुरुस्तीचे काम करणारा एक जेसीबी मशीन पलटी झाल्याची घटना घडली. या रस्ता दुरुस्ती करणार्‍या एका खासगी कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू असून, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या छोट्या अपघातामुळे रस्ता कामातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या सुरू असलेल्या या रस्ता कामामुळे संपूर्ण रस्ता धुळीने माखला असून, येथून ये-जा करणार्‍या दुचाकीस्वारांना आणि वाहनचालकांना समोरचे दृश्य स्पष्ट दिसत नाही. या धुळीचा प्रचंड त्रास रस्त्याशेजारील घरे आणि दुकाने यांना सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्यावर पाणी मारण्यासारख्या साध्या उपाययोजना ठेकेदाराकडून केल्या जात नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे प्रवाशांसोबतच स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. रस्ता कामातील नियोजनाचा अभाव प्रामुख्याने तिलारी कॉलनी परिसरात पाहायला मिळत आहे.

टाइम्स स्पेशल

येथे एका बाजूला पसरलेली खडी चक्क दुसर्‍या बाजूच्या वाहतुकीसाठी सोडलेल्या रस्त्यापर्यंत पसरली आहे. यामुळे दुचाकी वाहने घसरून मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता दुरुस्तीचे काम करत असताना संबंधित यंत्रणेने रहदारीचा विचार करून सुरक्षेच्या उपाययोजना करणे अनिवार्य आहे, मात्र येथे नियमांना हरताळ फासला जात असल्याचे दिसून येते. संबंधित प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन ठेकेदाराला कडक सूचना द्याव्यात आणि प्रवाशांसाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg