loader
Breaking News
Breaking News
Foto

अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा जागीच मृत्यू

खेड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथील पारस आईस फॅक्टरीसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने मनिष मोहन धाडवे (४० रा. परशुराम-दुर्गेवाडी, चिपळूण) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चालकाने घटनास्थळावरून तातडीने पलायन केले. शनिवारी रात्री उशिरा अज्ञात चालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यातील मृत तरूण हा दारूचा व्यसनी होता. राहत्या घरातून दारू पिण्यासाठी तो लोटे येथे गेला होता. येथून पायी चालत येत असताना पारस आईस फॅक्टरीसमोर मागून आलेल्या अज्ञात अवजड वाहनाने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांना कोणतीही कल्पना न देता अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.

टाइम्स स्पेशल

या अपघातामुळे काहीकाळ वाहतूकही ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच लोटे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. पसार चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याबाबत संदीप गंगाराम साळवी (रा. पिरलोटे-बेलवाडी) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg