loader
Breaking News
Breaking News
Foto

वैमानिकाचा निर्णय दुर्दैवी, विमान सुस्थितीत होते, विमान कंपनी संचालकांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले ते विमान सुस्थितीत होते. वैमानिकाचा तो निर्णय दुर्दैवी ठरला असा विमान कंपनी व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक विजयकुमार सिंग यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नसून खराब हवामानामुळे धावपट्टी न दिसल्याने व वैमानिकाच्या निर्णयामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोठे लँडिंग करावे हे सर्वस्वी वैमानिकाच्या निर्णयावर अवलंबून असते. वैमानिकाने आधी रनवे २९ वरुन उतरण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरल्याने त्याने मिस्ड अर्पोच घेतला. त्यानंतर पुन्हा रनवे ११ वरुन लँडींग करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही ठिकाणी वैमानिकाला धावपट्टी नीट दिसत नसावी, आणि वैमानिकाने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. हीच चूक ठरली. कॅप्टन सुमीत कपूर माझ्या भावासारखे होते तर कॅप्टन शांभवी पाठक माझ्या मुलीसारखे होते. हे दोन्ही उत्कृष्ठ वैमानिक होते. सध्या आमचे प्राधान्य मृतांच्या कुटुंबियांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आहे. २०२३ मध्ये देखील मुसळधार पाऊस आणि कमी दृष्यमानता कारणीभूत होती. लँडींगनंतर धावपट्टीवरुन विमान घसरल्याने तो अपघात झाला होता, असेही सिंग म्हणाले.

टाइम्स स्पेशल

विमान सुस्थितीत असल्याने उड्डाणानंतर कोणत्याही धोक्याचा किंवा आणिबाणीचा संदेश दिला नव्हता. सुरवातील धावपट्टी दिसत नसल्याचे वैमानिकांनी सांगितले. लँडिगची परवानगी मिळाल्यानंतर वैमानिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला आग लागल्याचे निदर्शनास आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg