loader
Breaking News
Breaking News
Foto

नालासोपाऱ्यात अत्याचार करून पळालेल्या आरोपीला सावंतवाडीतून अटक; पोलिसांची धडक कारवाई

सावंतवाडी (प्रतिनिधी) - वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा (तुळींज) परिसरात एका महिलेवर अत्याचार करून पसार झालेल्या संशयित आरोपीला पकडण्यात सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. ध्रुवकुमार शिवसहाय शर्मा (रा. नालासोपारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याला पुढील कारवाईसाठी नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी ध्रुवकुमार शर्मा याने नालासोपारा येथील तुळींज परिसरात एका महिलेवर अत्याचार केला होता. या घटनेनंतर तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता. नालासोपारा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित कोकणात, विशेषतः सावंतवाडी परिसरात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्याचे एएसआय निलेश परब आणि हवालदार मनोज राऊत यांनी तातडीने शोधमोहीम राबवली. अत्यंत शिताफीने तपास करत पोलिसांनी संशयित आरोपी ध्रुवकुमार शर्मा याला सावंतवाडीतून ताब्यात घेतले. ​सावंतवाडी पोलिसांनी ही कारवाई पूर्ण केल्यानंतर, नालासोपारा पोलिसांचे पथक दाखल होताच संशयित आरोपीला त्यांच्या हवाली करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पसार झालेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून सावंतवाडी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg