loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना (शिंदे गट) मालवण तालुकाप्रमुख पदी मंदार लुडबे यांची नियुक्ती

मालवण (प्रतिनिधी) - शिंदे शिवसेनेचे देवबाग विभागप्रमुख मंदार संजय लुडबे यांना बढती देण्यात आली असून तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या जागी तालुकाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मंदार लुडबे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, असा विश्वास त्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी तालुकाप्रमुख विनायक बाईत, राजा गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, संदीप परब, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, शिवसेना तालुका चिटणीस मकरंद राणे, छोटू ठाकूर, संदीप भोजणे, उमेश बिरमोळे, महेश लुडबे, सुरज बिरमोळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg