loader
Breaking News
Breaking News
Foto

​तळवडे-निरूस्तेवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा; ४ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - तळवडे-निरूस्तेवाडी येथील गॅरेजच्या पाठीमागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या 'अंदर-बाहर' जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत संशयित आरोपी रविंद्र विनायक लोके याच्यासह १० जणांवर कारवाई करण्यात आली असून, २१ हजार रुपयांची रोकड आणि ७ मोटारसायकली असा एकूण ४ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ ते ११ च्या सुमारास तळवडे-निरूस्तेवाडी येथील आंगचेकर यांच्या गॅरेजच्या मागे सुमारे २०० मीटर अंतरावर चार्जिंग बल्बच्या उजेडात जुगाराचा डाव सुरू होता. संशयित आरोपी रविंद्र विनायक लोके हा परिसरातील १० जणांना जुगार खेळवत असताना पोलिसांनी अचानक धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरून रोख २१ हजार रुपये, जुगाराचे साहित्य आणि आरोपींनी वापरलेल्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ​ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पीएसआय सुधीर सावंत, जमादार सुरेश राठोड, हवालदार प्रकाश कदम, गोसावी, डिसोजा, गंगावणे, तवटे आणि समजिस्कर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg