loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडमध्ये ४ पक्षांची आघाडी एकत्रित उमेदवारी अर्ज केले दाखल

मंडणगड (वार्ताहर) : स्थानीक स्वराज्य संस्थाचे निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजीत पवार गट, शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चार पक्षांचे आघाडीचे वतीने जिल्हा परिषदेच्या २ व पंचायत समितीच्या ४ जांगाकरिता (२१) जानेवारी २०२६ रोजी निवडणुक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गोवळे यांच्या नेतृत्वाखाली चारही पक्षांचे कार्यकर्ते गोळा झाले यावेळी प्रकाश शिगवण, मुश्ताकर मिरकर, प्रविण कदम, संतोष गोवळे, वैष्णवी टक्के, कल्पिता खांबे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी राष्ट्रवादीचे भाई पोस्टुरे, सुभाष सापटे, समंद मांडलेकर, फैरोज उकये, हसरत खोपटकर,वैभव कोकाटे, सुभाष शिगवण, हेमंत सालदूरकर, राकेश साळुंखे, सुनील खाडे, अनिल घरटकर, चंद्रकांत खेराडे, उबाठा शिवसेनेचे कलंदर जोगिलकर, संदीप वाघे, जितेंद्र सापटे, अशोक गोठल व आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीसाठी कार्यकर्ते व तालुक्यातील मतदारांच्या इच्छेनुसार चार पक्षाची आघाडी झाली असून आघाडीत ठरल्यानुसार विविध गण व गटात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत चार पक्षांचे कार्यकर्ते व नेते या निवडणुकीसाठी एकत्र आले असून एकत्रीत निवडणुकांना सामोरे जात विजय संपादीत करणार आहोत, असे राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादाम यांनी म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

जनता कार्यकर्ते व मतदारांच्या इच्छेनुसार जनतेच्या हाकेला ओ देत आघाडी करण्याची रणनिती आम्ही आखली आहे व ही आघाडी जनतेच्या मनातील आघाडी असल्याने निर्णयात यशस्वी होण्याचा विश्वास आहे. भविष्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होऊन जातील व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील, असे उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गोवळे यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg