loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. आणि पं. स. निवडणुक तोंडावर असतानाच नाटळमध्ये ठाकरे गट शाखाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नाटळ परिसरात मोठा धक्का बसला असून, उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा कणकवली नाटळ येथे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नाम. नितेश राणे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नाटळ विभाग प्रमुख प्रदीप सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश सावंत, नाटळ महिला विभाग प्रमुख अनिता सावंत, युवा सेना शाखाप्रमुख सचिन खांदारे, ग्रामपंचायत सदस्य पदमाकर पांगम, संजना सावंत, सुनिता जाधव, शाखाप्रमुख सचिन सावंत, अभिषेक सावंत, तसेच माजी उपसरपंच रमेश नाटळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यांच्यासह समीर सावंत, अनिल सावंत, नागेश बोडेकर, दत्तु भोगले, दीपाली भोगले, सुरेखा सावंत, अवधूत तरंगे, सीमा तरंगे, पांडुरंग कोकरे, बाळा कोकरे, मंगेश शिंदे, सूर्यकांत सरंगले, सुप्रिया सरंगले, चंद्रकांत सरंगले, अशोक सावंत, शुभांगी सावंत, साहिल सावंत, कोंडीबा खरात, संजय सावंत, शोभा सावंत, दिपेश डोंगरे, अमोल डोंगरे, अशय परब, शोभा परब, सुनील भोसले, सोनाली भोसले, योगेश भोगले, अक्षता सावंत, प्रकाश सावंत, ज्योती सावंत, विजय सावंत, राहुल सावंत, कुणाल राणे, सिद्धी सावंत, विलास सावंत, ऋतिक गुरव, बाळा गोसावी, बबन सावंत, राजू सावंत, सतीश सावंत, अजय सावंत, नितीन सावंत, सुनील जाधव, शरद खोचरे, सत्यवान खोचरे, सुमती जाधव, पॉली फर्नांडिस, क्लेमेंट चोडणेकर, रोशन फर्नांडिस, रेमित चोडणेकर, मनोज सावंत, संभाजी सावंत, विश्वनाथ सावंत, शरद नार्वेकर, भरत नार्वेकर, भाई आरडेकर, रामा मेस्त्री, बाबुराव मेस्त्री, संदीप मेस्त्री, विलास पावसकर, सुधा पांगम, संजय पांगम, रोहित नाटळकर आदी असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे नाटळ परिसरात भाजपचे संघटन अधिक बळकट झाले असून, ठाकरे शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर मोठे भगदाड पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg