सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने आयोजित "भंडारी चषक" क्रिकेट स्पर्धा २०२६ येथील जिमखाना मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत निरवडे संघाने अंतिम सामन्यात मंगलमूर्ती शेरले संघावर एकतर्फी मात करून मानाचा "भंडारी चषकावर " नाव कोरले. यावेळी विजेत्या निरवडे संघाला मानाचा भंडारी चषक व रोख रुपये १५ हजार कै.मनोहर राऊळ यांच्या स्मरणार्थ श्रीम.रंजना राऊळ यांजकडून तर उपविजेत्या मंगलमूर्ती शेरले संघाला मानाचा चषक व रोख १० हजार रुपये उमेश तळवणेकर पुरस्कृत पारितोषिके डॉ.दिनेश नागवेकर व नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर व अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून निरवडे संघाच्या कौस्तुभला मानाचा चषक व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट झेल अशी पारितोषिक यावेळी वितरित करण्यात आली.
या संपूर्ण स्पर्धेत शिस्तबध संघ म्हणून वेताळेश्वर आजगाव संघाला, तर खिलाडूवृत्तीसाठीचा पुरस्कार मळगाव संघाला देऊन सन्मानीत करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन तर संजय पिळणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी भंडारी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे विवीध उपक्रम राबवीत असल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले. तसेच पुढील वर्षी यापेक्षा भव्य "भंडारी क्रिकेट स्पर्धा" घेण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर सचिव दिलीप पेडणेकर, प्रतिभा कांबळी, शीतल नाईक, समता सूर्याजी, पेडणेकर, संगीता हडकर, धुरी, नारायण मसुरकर, राजेंद्र बिर्जे, भरत कांबळी, संतोष वैज, लवू कुडव, हनुमंत पेडणेकर, उत्तम कुडव, बाळ चोडणकर, निलेश कुडव, सिद्धार्थ पराडकर, प्रदीप नाईक, चंद्रकांत वाडकर, सुधीर पराडकर, शेखर पेडणेकर, भगवान रेडकर, विद्याधर आडारकर, आनंद तळवणेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत निगूडे, सातार्डा, नेमळे, मळगाव, सावंतवाडी शहर, कारीवडे, बांदा, सातोसे, माजगाव, तळवडे आदी १६ संघानी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय पिळणकर यांनी केले.

























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.