loader
Breaking News
Breaking News
Foto

२६ जानेवारी रोजी केळशी येथे हजरत पीर याकूब बाबा यांचा ३४६ वा उर्स शरीफ सोहळा

संगलट, खेड (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील उटंबर (केळशी) येथील ऐतिहासिक 'हजरत पीर याकूब बाबा सरवरी दर्गा ट्रस्ट'च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु मानले जाणारे हजरत पीर याकूब बाबा यांचा ३४६ वा वार्षिक उर्स शरीफ सोहळा सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून रायगड-रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुजीब रुमाणे (सदस्य, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ), अजय बिरवटकर (सदस्य, जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी) आणि साधनाताई बोत्रे (महिला जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाची रूपरेषा ​उर्सनिमित्त रात्रीच्या सत्रात भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे: ​रात्री ७ ते १०: नियाज (स्नेहभोजन) - भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था. ​रात्री १०: सत्कार समारंभ व आभार प्रदर्शन. ​रात्री ११: कव्वालीचा जंगी कार्यक्रम. जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध कव्वाल सरफराज साबरी आपली कला सादर करतील. ​मध्यरात्री ३: पारंपारिक पद्धतीने संदल मिरवणूक काढण्यात येईल. ​दर्गा ट्रस्टचे नियोजन ​या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष मकबुल दिनवारे, सचिव जहूर झोंबडकर, खजिनदार मस्जिद चोगले, सहसचिव अमजद चाऊस, कार्याध्यक्ष फैयाज बोरकर आणि सर्व सदस्य व हितचिंतक परिश्रम घेत आहेत. ​हा सोहळा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून, जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा आणि कव्वालीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नियाज (स्नेहभोजन) कार्यक्रम रात्री १० वाजेपर्यंतच सुरू राहील, याची भाविकांनी नोंद घ्यावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg