loader
Breaking News
Breaking News
Foto

जिद्दी प्रांजल प्रतिकूल परिस्थितीत ही ठरली इस्त्रो दौर्‍यासाठी पात्र

संगलट, खेड (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवशी येथील, प्रांजल सुषमा चंद्रकांत खळे या विद्यार्थीनीची इस्रो अभ्यास दौर्‍यासाठी निवड झाली असून, प्रांजलने नवशी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचे मुख्याध्यापिका प्रज्ञा देवघरकर यांनी तिचा सत्कार करतांना मत व्यक्त केले, तर जिद्द आणि सचोटीमुळे परिस्थीतीवर मात करता येते हे प्रांजलने दाखवून दिले. असे तिच्या सत्कारप्रसंगी केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी गौरवोद्गार काढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घरची परिस्थिती बेताचीच, मोबाईल फोन अथवा कोणत्याही सोयी सुविधा नसतांनाही प्रांजल ही अत्यंत हुशार, जिद्दी, चिकाटी, आणि जिज्ञासूवृत्तीची असल्यामुळे तिने घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळविले. तिचे कौतुक सर्वत्र होत असून, तिला आरजू राठोड यांचेसह मुख्याध्यापक प्रज्ञा देवघरकर, दिपक जाधव, सोमनाथ माने यांचे मार्गदर्शन लाभले. तर पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे चांगले योगदान लाभले.

टाइम्स स्पेशल

तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मा.गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, केंद्र प्रमुख संजय जंगम सरपंच, गाव अध्यक्ष ग़्रामस्थ मंडळ, महिलामंडळ यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg