loader
Breaking News
Breaking News
Foto

रांजणपाडा येथे माघी गणेशोत्सव उत्साहात

पनवेल (प्रतिनिधी) :- माघी गणपती निमित्त पंडित उमेश निवृत्तीबुवा चौधरी यांच्या वतीने रांजणपाडा (खारघर) येथे भव्य गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र सोहळ्यासाठी परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. हजारो भाविकांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजाअर्चा केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण रांजणपाडा परिसर भक्तिमय वातावरणाने नटला होता. भक्तांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे चौधरी कुटुंबीयांच्या वतीने आदरपूर्वक स्वागत करण्यात आले. भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. माघी गणपती हा भक्तांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा केंद्रबिंदू असून, या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवामुळे सामाजिक एकोपा आणि भक्तिभाव अधिक दृढ झाला.

टाइम्स स्पेशल

या उत्सवानिमित्त नवदुर्गा महीला प्रासादिक भजन मंडळ कोपरा, आणि हनुमान प्रासादिक भजन मंडळ पळस्पे यांचे भजन, प्रख्यात सितारवादक पं.मारूती पाटील यांचे सतारवादन तसेच पं.उमेश चौधरी यांचे शास्त्रीय गायन कार्यक्रमे आयोजित करण्यात आली होती. गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे पंडित उमेश निवृत्तीबुवा चौधरी यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg