loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी व व्यापाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांची पाहणी

सावंतवाडी - शहराच्या बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी आणि व्यापाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून व्यापाऱ्यांशी संवाद साधला. बाजारपेठेत येणा-जाणाऱ्या गाड्यांना आणि पार्किंगला अडथळा होऊ नये म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यात आणि पालिकेत भाजपची सत्ता असल्याने यापुढे कोणालाही त्रास होणार नाही, मात्र शिस्त राखण्यासाठी व्यापाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात लवकरच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. ​यावेळी इंदिरा गांधी व्यापारी संकुल परिसरातील स्वच्छतागृहाचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेत आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील बाळकृष्ण कोल्ड्रिंक्सच्या पाठीमागे असलेले शौचालय सायंकाळी सात वाजताच बंद केले जात असल्याने व्यापारी आणि विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत होती. व्यापारी कुणाल श्रृंगारे आणि पुंडलिक दळवी यांनी या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर, निरवडेकर यांनी तातडीने नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर आणि प्रतिक बांदेकर यांच्यासह परिसराची पाहणी केली. महिलांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेच्या पाठीमागील बंद असलेले स्वच्छतागृह पुन्हा सुरू करण्याबाबत किंवा त्या ठिकाणी नवीन स्वच्छतागृह बांधण्याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

टाईम्स स्पेशल

पाहणी दरम्यान संकुल परिसरातील तुटलेल्या फरश्यांचीही त्यांनी दखल घेतली आणि त्या तत्काळ बसविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. व्यापाऱ्यांशी चर्चा करताना निरवडेकर म्हणाले की, प्रशासन केवळ तुमची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोणालाही त्रास देण्याचा आमचा हेतू नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनी निश्चिंत राहावे. भाजप सरकार व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून, सर्वांच्या सहकार्याने बाजारपेठेतील प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना आणि व्यापाऱ्यांना दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg