loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलीस मुख्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि कोटपा २००३ विषयावरील कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (छत्रपती संभाजीनगर) आणि रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने काल (२१ जानेवारी) पोलीस मुख्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि कोटपा २००३ विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सार्वजनिक धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचा मोठा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होत आहे. यासाठी तंबाखू नियंत्रणासाठी असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि कोटपा २००३ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याच विषयाला अनुसरून ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट उपस्थित होते. यावेळी संचालक अप्पासाहेब उगले यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेत धूम्रपान, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा २००३ (कोटपा २००३) या विषयावर सखोल माहिती देण्यात आली. कोटपा २००३ कायद्याचे प्रमुख पाच कलमे आहेत. कलम चार नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान प्रतिबंध आहे, कलम सहा ब नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास प्रतिबंध आहे. कलम सहा अ अनुसार बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरातीवर प्रतिबंध आहे. या कार्यशाळेसाठी सूत्रसंचालन अनिल गुंजे विभागीय व्यवस्था सोलापूर यांनी केले. या कार्यशाळेला रत्नागिरी जिल्हा सर्व पोलीस स्थानक येथील पोलीस निरीक्षक व अंमलदार उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी राज्य प्रकल्प अधिकारी श्याम सुंदर कदम, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे (छत्रपती संभाजीनगर) राज्य प्रकल्प व्यवस्थापक डॉ. निखिल थोरात, सामाजिक कार्यकर्ता सचिन भरणे व मानसशास्त्रज्ञ प्राची भोसले, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg