loader
Breaking News
Breaking News
Foto

विकसित भारताचा मार्ग भाषा आणि सामाजिक शास्त्राच्या गुणात्मक विकासातून पुढे जाईल : डॉक्टर केतन चौधरी

रत्नागिरी (जमीर खलफे) - विकसित भारताचा मार्ग भाषा आणि सामाजिक शास्त्राच्या गुणात्मक विकासातून पुढे जाईल. भाषा आणि सामाजिक सामाजिक शास्त्राच्या शिक्षणातून सामाजिक मूल्ये विकसित होतात. लोकशाही मूल्यांची जोपासना होते, विकसित भारतासाठी त्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉक्टर केतन चौधरी यांनी केले. भारताच्या सांस्कृतिक सातत्यासाठी भाषा आणि सामाजिक शास्त्राची भूमिका महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी आयोजित आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मत्स्य अभियांञिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर केतन कुमार चौधरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे ही परिषद सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विजयराव साखळकर होते तर कार्यवाह सतीश शेवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि महाविद्यालयाच्या उदय आणि विकासाचा मागवा घेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सुसंगत स्वायत्त महाविद्यालयाचा अभ्यासक्रमाच्या रचनेवर प्रकाश टाकला. मत्स्य विज्ञान आणि अर्थशास्त्र यांच्यातील अंतर संबंध स्पष्ट करून आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन श्रोत्यांसमोर मांडला. विशेषीकरणाचे दिवस आता संपले आणि आंतरविद्या शाखेला सुरुवात झाली आहे हे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पुनर्प्रवेशाच्या संधीमुळे शिक्षण शिक्षण बंद केलेल्या अनेकांना आता संधी मिळणार आहे त्यातून कुशल मनुष्यबळ विकसित होईल आणि विकसित भारताचा मार्ग सुकर होईल. गुणात्मक संशोधन ही विकसित भारताची पूर्व अट आहे. संशोधन अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ होत असल्याचे वास्तव त्यांनी पुढे आणले.

टाईम्स स्पेशल

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उच्च शिक्षणातील या बदलाला आपण सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देऊया असे आवाहन त्यांनी केले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे संज्ञात्मक ज्ञानाचा विकास होतो, संकल्पनिक स्पष्टता येते, तिथे भावना आणि संस्कृतीचा लगाव असतो त्यामुळे आकलन सुलभ होते. आज परिणामी ग्रामीण आणि आदिवासी भागातील उच्च शिक्षणातील प्रवेश दर वाढत आहे. संस्कृत आणि प्राचीन भाषा भारतीय सभ्यतेच्या वाहक आहेत, त्या आत्मविश्वास देतात. सर्व भारतीयांना विश्वगुरू होण्याची संधी देतात. भाषांच्या कौशल्य वृद्धीतून रोजगाराच्या संधी वाढतील आणि सामाजिक शास्त्राच्या अभ्यासातून संविधानिक मूल्ये, जबाबदार नागरिक आणि नैतिक नेतृत्व घडेल अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शाश्वत लोकशाहीसाठी भाषा आणि मानव्यविद्यांची गरज त्यांनी अधोरेखित केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg