loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रबोधनकार ठाकरे उद्यानमध्ये कोकणी मुस्लिम संघ व लेडीज विंग्स आयोजित 'तारे जमीन पर' कार्यक्रम

खेड (प्रतिनिधी)- शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानामध्ये २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी कोकणी मुस्लिम संघ व लेडीज विंग्स आयोजित 'तारे जमीन पर' या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर व विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक - गटनेते रहीम सहिबोले यांनी उपस्थिती दर्शविली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात लहान शाळकरी मुलांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेवक - गटनेते रहीम सहिबोले यांचे कोकणी मुस्लिम संघ व लेडीज विंग्स यांच्यातर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर वैभव खेडेकर व वैभवी खेडेकर हस्ते प्रथम तीन क्रमांक पटकवणाऱ्या मुलांना सायकल भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

हा कार्यक्रम दुपारपासून सुरू आहे आणि गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने या उपक्रमाला उपस्थित राहण्याचा मला मान मिळत आहे. आपल्या संघटनेच्या प्रचंड मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे दरवर्षी हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी होत आहे. या कार्यक्रमाला गेल्या - चार वर्षांपासून वैभव सातत्याने येत आहे. या माध्यमातून शाळकरी मुलांना प्रोत्साहन दिले जाते, या गोष्टीचे विशेष समाधान वाटते. कोकणी मुस्लिम संघाने भरवलेला हा कार्यक्रम म्हणजे लहान मुलांना एक मुक्त व्यासपीठ मिळवून देणारा अतिशय स्तुत्य कार्यक्रम असल्याचे मत यावेळी व्यक्त केले व आता तर महिला पदाधिकारी देखील सक्रियपणे कार्यरत झाल्या आहेत, त्यामुळे या संघाचे काम आणखीनच प्रगतशील होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच या स्पर्धात्मक कार्यक्रमाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg