loader
Breaking News
Breaking News
Foto

​आंबोलीत भाजप उमेदवाराच्या बॅनरला फासले काळे; शिवसेनेकडून तीव्र निषेध, पोलिसांत तक्रार

​आंबोली (प्रतिनिधी) : आंबोली गावठाणवाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बॅनरवर काही अज्ञातांनी काळे फासल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांत लेखी तक्रार देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेना आणि भाजपची महायुती सत्तास्थानी असताना, स्थानिक पातळीवर काही जागांवर उभय पक्षांत 'मैत्रीपूर्ण लढत' होत आहे. आंबोली परिसरात दोन्ही पक्षांकडून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रचार सुरू असतानाच, सोमवारी (२ फेब्रुवारी) सकाळी गावठाणवाडी येथील भाजप उमेदवाराच्या बॅनरवर काळे फासल्याचे निदर्शनास आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करत आहोत. अशा प्रकारचे कृत्य करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना आम्ही खपवून घेणार नाही," अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस दूरक्षेत्राच्या बिट अंमलदारांना निवेदन देण्यात आले असून, ​बॅनरची विटंबना करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ​गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी असे निवेदनात म्हटले आहे. ​हे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, पंचायत समिती उमेदवार मायकल डिसोझा, विभागप्रमुख विलास गावडे, सुनील नार्वेकर, हेमंत नार्वेकर आणि विशाल बेरेकर यांनी पोलीस दूरक्षेत्रावर दिले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg