दोडामार्ग (प्रतिनिधी) - अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ पालखीचे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता आगमन झाले. राष्ट्रोळी मंदीर ते पिंपळेश्वर हाॅल दोडामार्ग अशी भव्य मिरवणूक काढत स्वामी समर्थ पादुका पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो भक्त दिंडी मिरवणूक मध्ये सहभागी झाले होते. यावेळी श्री स्वामी समर्थ जयघोष करण्यात आला. दोडामार्ग श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ दोडामार्ग यांच्या वतीने दरवर्षी श्री स्वामी समर्थ पालखीचे नियोजन जानेवारी महिन्यात केले जाते. यावेळी पंधराव्या वर्षी पालखी आगमन झाले. सहा वाजता दोडामार्ग राष्ट्रोळी मंदीर येथे आगमन झाले येथे भव्य स्वागत करण्यात आले.
यानंतर दिंडी पथक तसेच भक्त मंडळी यांच्या वतीने मिरवणूक काढत पालखी नियोजित कार्यक्रमस्थळी आगमन झाले. श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन घेण्यासाठी पिंपळेश्वर हाॅल येथे ठेवण्यात आली या ठिकाणी आकर्षक सजावट, विधुत रोषणाई, रांगोळी काढण्यात आली होती. या नंतर दर्शन सोहळा आरती महाप्रसाद तसेच राञी विविध स्वामी समर्थ जीवनावर आधारित कार्यक्रम पार पडले. शेकडो भक्तांनी दर्शन घेतले. स्वामी समर्थ मंडळ दोडामार्ग यांनी योग्य नियोजन केले होते.

























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.