loader
Breaking News
Breaking News
Foto

बाबासाहेब आंबेडकर विचारांचे संस्कार , जयंतीला येतो , नाशिकमध्ये आंदोलक आक्रमक... निर्णयावर ठाम!

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजवंदन सोहळा गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख नसल्याचा आरोप करण्यात आला. याच मुद्द्यावर माधवी जाधव या महिला वनकर्मचाऱ्याने कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. बाबासाहेबांचा नामोल्लेख कसा काय टाळला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. वर्दीत असतानाच मंत्र्यांना जाहीर प्रश्न विचारल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निलंबन झाले तरी चालेल, पण बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका माधवी जाधव यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे हा प्रकार केवळ एका भाषणापुरता मर्यादित न राहता मोठ्या वादात बदलला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती पसरताच नाशिकमधील आंबेडकरी संघटना आणि भीम सैनिक रस्त्यावर उतरले. गिरीश महाजन यांनी जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही या महद्यावर महाजनांवर कारवाईची मागणी केली. वाद अधिक चिघळत असतानाच गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महाजन म्हणाले की, भाषणात चुकून बाबासाहेबांचा उल्लेख राहून गेला असेल तर त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करतात. त्यानंतर रात्री त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच आपण आहोत, असे म्हणत त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांप्रती आपली निष्ठा दर्शवली. भाजपचे संस्कार बाबासाहेबांचे विचार जपणारे असल्याचे सांगत, आपण स्वतः गेल्या 40 वर्षांपासून आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या पोस्टसोबत त्यांनी आपल्या भाषणाची क्लिपही शेअर केली आहे.

टाइम्स स्पेशल

मात्र, गिरीश महाजनांच्या दिलगिरीनंतरही वाद पूर्णपणे शांत झालेला नाही. शासकीय कर्मचारी, तीही महिला, अशा प्रकारे थेट मंत्र्यांना जाहीरपणे सवाल करताना सहसा दिसत नाही, मात्र बाबासाहेबांच्या नामोल्लेखाचा मुद्दा असल्याने माधवी जाधव यांनी घेतलेली भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या धाडसाची चर्चा वनविभागासह इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही सुरू आहे. दुसरीकडे, आंदोलनाची भूमिका घेतलेल्या आंबेडकरी संघटनांनी हा विषय केवळ एका चुकापुरता मर्यादित न ठेवता, बाबासाहेबांच्या सन्मानाशी जोडलेला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिलगिरीनंतरही हा वाद राजकीय आणि सामाजिक पातळीवर आणखी किती काळ तापणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg