रत्नागिरी - रत्नागिरी तालुका रोहिदास समाज सेवा संघाच्यावतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची रत्नागिरी येथील ३८ वी जयंती दिनांक १ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी आनंदी व भक्तिमय वातावरणात पूजा-अर्चा, अभिषेक, भजन-कीर्तन, आरती असे धार्मिक विधी पार पडले. समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तसेच रत्नागिरी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या प्रसंगी रत्नागिरी तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे अध्यक्ष विजय खेडेकर, उपाध्यक्ष शरद गोळपकर, उपाध्यक्ष सायली बसणकर, सरचिटणीस उदय कोतवडेकर, खजिनदार संतोष खेडेकर, कार्याध्यक्ष परशुराम कदम, सरचिटणीस विजय चव्हाण, विवेक खेडेकर आदी पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.