ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ जानेवारी २०२६ रोजी महेश नाखवा यांचा अज्ञात आरोपीने चाकूने भोकसून निर्दयी खुन केला होता. याप्रकरणी फरार दोघा आरोपींना नायगाव पुर्व येथील कच्छ दरबार ढाब्याजवळ मुंबई अमदाबाद हायवेजवळ ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षाकडून तात्काळ अटक करण्यात आले.
ठाणे नगर पोलिस ठाण्यात महेश नाखवा यांचा खून प्रकरणी भा.न्या.सं. सन २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे २८ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांनी गुन्हयाचा समांतर तपास करण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर नमुद गुन्हयाचा समांतर तपास करून घटनास्थळावरील सि.सि.टि.व्ही. फुटेज व तांत्रीक विष्लेशनाव्दारे दोघा संशयीत इसम नामे १) काली उर्फ रघु जयंतीभाई चौहान वय २७ वर्षे, राह. गोकुळनगर नं. १, अजी डॅम, ता. जि. राजकोट, जि. गुजरात, २) शायर विनुभाई मंग्रोलिया वय २१ वर्षे, राह. परब रोड, सोवारिया, ता. बेसान, जि. जुनागढ, राज्य गुजरात यांना नायगाव पुर्व येथील कच्छ दरबार ढाब्याजवळ मुंबई अमदाबाद हायवे या ठीकाणावरून गुजरात येथे पळून जाण्याचे तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले.
सदर संशयीत इसमाकडे केलेल्या कौश्यल्यपुर्ण तपासात त्यांनी इसम नामे काली उर्फ रघु याची प्रेयसी गिता माली हिस मयत इसम त्रास देत असल्यामुळे दोघांनी मयत यास चाकूने भोकसुन जिवे ठार मारले असल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपी यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. तसेच महिला आरोपी गिता मुकेश माली हिस देखील ठाणेनगर पोलीसांनी अटक केली. सदरची कारवाई ही अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त गुन्हे, ठाणे, विनय घोरपडे, रहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, शोध २, गुन्हे, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनिरी/गोरखनाथ घार्गे, पोनि/प्रताप भोसले, मपोउनि/शितल पाटील, पोउनि /संजय भिसे, सपोउनि/शिवाजी गायकवाड, पोहवा दिनेश कुंभारे, पोहवा/जयकर जाधव, पोहवा/प्रशांत भुर्के, पोहवा/संदीप भांगरे, पोहवा/महेश साबळे, पोहवा/राहुल शिरसाठ, पोना/सचिन वानखेडे, पोना/सचिन कोळी, पोना/तौसीफ सैयद, पोअं/महेश सावंत, चापोअं/सदन मुळे, तसेच मपोहवा/आशा गोळे, मपोना/गिताली पाटील यांनी केलेली आहे.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.