सावंतवाडी - तळवडे जिल्हा परिषद मतदार संघ विकासात नंबर वन करण्याचे उद्दिष्ट ठेवून मी निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. त्यामुळे येथील जनतेने माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहावे, अशी साथ जिल्हा परिषदेचे भाजपचे अधिकृत उमेदवार संदीप गावडे यांनी आज येथे दिली. दरम्यान आगामी काळात मळगाव आणि तळवडे हे दोन्ही गाव शहरीकरणाकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील जनतेने महायुतीच्या पाठिशी राहावे, असेही त्यांनी सांगितले. गावडे यांच्यासह पंचायत समितीचे उमेदवार सुश्मीता जाधव यांचा आज प्रचाराचा शुभारंभ निरवडे येथील भूतनाथ मंदिरात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, शिवसेनेचे कार्यकर्ते सुरज परब, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, माजी सरपंच सदा गावडे, हरी वारंग, सुहास गावडे, संतोष गावडे, बाबुराव गावडे, लाडू गावडे, चेतन गावडे, महेंद्र गावडे, रोहन मल्हार, चिन्मय सावंत, प्रकाश माळकर, संभाजी माळकर, गुरुदास गावडे, उमाकांत गावडे, नारायण गावडे, सुरज गावडे, शुभम गावडे आदी उपस्थित होते. यावेळी गावडे म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेचा मोठा आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळत असून, सर्व स्थानिक नागरिक सोबत असल्याने विजयाचा मार्ग सुखकर झाला आहे. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्ह्यात एक नंबरवर नेण्याचा आपला मानस आहे. तळवडे आणि मळगाव भागातील लोकांचे प्रश्न ज्याला स्वतःचे वाटतात, तोच खऱ्या अर्थाने जनतेचा प्रतिनिधी असतो आणि मला लोकांचे प्रश्न माझे स्वतःचे वाटतात, म्हणूनच मी लोकांमधला माणूस आहे, असे ही ते म्हणाले.
गावडे पुढे म्हणाले की, तळवडे आणि मळगाव ही दोन्ही गावे आता केवळ छोटी खेडी राहिलेली नसून ती वेगाने शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या भागातून जाणारा महामार्ग आणि रेल्वे स्टेशनमुळे येथील अर्थकारण विस्तारले आहे. अशा परिस्थितीत या गावांचा विकास करायचा असेल तर केवळ छोट्या निधीवर अवलंबून राहून चालणार नाही, तर मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी लागेल. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपाचा निधी उपलब्ध करून देण्यावर माझा भर असेल. रेल्वे टर्मिनसचा प्रश्न हा या भागासाठी अत्यंत महत्त्वाचा असून भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून तो लवकरात-लवकर सोडवला जाईल. तसेच युवक आणि नागरिकांच्या मनात विकासाचे जे स्वप्न आहे, ते सत्यात उतरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. दरम्यान जास्तीत-जास्त रेल्वे गाड्यांना सावंतवाडीत थांबा मिळावा यासाठी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.