loader
Breaking News
Breaking News
Foto

कुडाळकर हायस्कूलच्या हरितसेना विभागाचा विशेष सन्मान

मालवण (प्रतिनिधी) - राष्ट्रीय हरितसेना योजना अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागासोबत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचालित डॉ. कुडाळकर हायस्कूल, मालवणच्या हरितसेना विभागाचा वन विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. प्रशालेचे हरितसेना विभागप्रमुख आठलेकर यांनी विभागीय वनअधिकारी राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते गौरव प्रशस्तीपत्र स्वीकारले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, हरितसेना विभागप्रमुख आठलेकर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विलास विष्णू झाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र राऊत यांनी संचालक मंडळाच्या वतीने पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सहभाग नोंदवलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

शाळेच्या हरितसेना विभागाने विविध पर्यावरण संवर्धन उपक्रम राबवून, नैसर्गिक संसाधनांच्या जतनासाठी व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढविण्यास हातभार लावला आहे. या प्रयत्नांचे कौतुक करून, त्यांना राष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या हरितसेना किंवा पर्यावरण शिक्षण कार्यक्रमांच्या अंतर्गत कुडाळकर हायस्कुलला हा सन्मान मिळाला आहे. कुडाळकर हायस्कूलच्या या यशामुळे परिसरातील इतर शाळांनाही पर्यावरण रक्षणातील क्रियाकलापांसाठी प्रेरणा मिळेल, अशी अशा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg