दापोली (प्रतिनिधी) - शिरसोली येथे लागलेल्या वणव्याच्या भडक्याने आंबा काजू झाडांसह वनसंपदा जळुन खाक झाली आहे. त्यामुळे वणव्याच्या आगीची झळ पोहोचलेल्या येथील शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील शिरसोली येथील महसुली गावाच्या हद्दीतील शिवारात लागलेल्या भिषण आगीच्या वणव्याच्या भडक्याने शेतक-यांच्या आंबा काजूच्या झाडांसह जंगली झाडे झुडपे, रोपं पार होरपळून गेल्याने शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वणवा कसा काय लागला याचे कारण समजले नसले तरी रानात वाळलेल्या सुक्या गवतामुळे वणव्याच्या आगीचा भडका चांगलाच पोफावला त्यात आंबा काजू लागवड जळाली असुन कोकणी रानमेव्याची रानटी रोपं झाडं झुडप वणव्याच्या आगीत पार होरपळून गेली. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे रानातील गवत पूर्णपणे सुकलेले आहे. शेतक-यांने भाजावळीसाठी आपल्या शिवारातील गवत राखून ठेवले होते.
या राखुन ठेवलेल्या सुक्या गवताने पेट घेतल्याने सपाट पठारावर स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या आंबा काजूच्या रोपांना आगीची झळ बसली तर मोहोर आलेले काजू पुर्णतः आगीने होरपळून गेले त्यामुळे तयार होत आलेल्या झाडावरील काजूबीया तसेच मोहोर जळाला तसेच करवंद, तोरणं, अळू, कुंबळं, बोरं आदीप्रकारच्या रानातील रानमेव्याची रोपेही वणव्याच्या आगीत जळून खाक झाली. तर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली रोप आणि रोपाला संरक्षण म्हणून उभारलेल्या जाळयांनीही पेट घेतल्याने शिरसोली येथील स्थानिक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.