loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थीप्रिय शिक्षक गजानन मोघेंच्या शोक सभेत सर्वांनाच अश्रू आवरेनात

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील गजानन मोघे (वय ५३) यांनी कठीण परिस्थितीवर मात करत दहावी पासूनच देवळे हायस्कूलमध्ये पहिला येऊन शिक्षकी पेशा पत्करला जेणेकरून आपल्या ज्ञानाचा फायदा सामान्य कुटुंबातील मुलांना व्हावा या उद्देशाने झोकुन दिले. मात्र दिनांक १९ जानेवारी रोजी ज्ञान दानाचे महान काम करत असताना चाफवली शाळा नंबर १ येथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने शाळेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेच्या शोक सभेत सर्वांनाच अश्रू आवरता आले नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चाफवली शाळा नं 1 मध्ये ज्ञानज्ञानाचे पवित्र कार्यकर्त्यांना करत असताना त्यांना अचानक हृदयविकारका झटका या झटक्यामुळे ते जाग्यावरच खुर्चीवर पडले काय झाले हे मुलांना कळेना. इथेच मोघे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या घटनेच्या चाफवली येथे. शोक सभा घेण्यात आली त्यावेळे बोलताना जि. प. माजी शिक्षण आणि अर्थ सभापती विलास चाळके, प्रकाश चाळके, शिक्षिका वर्षारानी कदम, संगिता मगदूम, शिक्षक काळे केंद्र प्रमुख बोडेकर, यांना आठवणीने अश्रू आवरता आले नाहीत. काही काळ सभा स्तब्ध झाली.

टाईम्स स्पेशल

देवळे हायस्कूल, देवळे ग्रामस्थ, यांनीही शोक सभा घेतल्या, तेथे असेच अश्रूंना आवरता आले नाही. अनेकांनी मधाळवाणीचे शिक्षक, लेखक, कवी, समाज कार्यकर्ता, समालोचक, विद्यार्थी प्रिय शिक्षक, संभाजी महाराजांवर निस्सिम प्रेम करणारी व्यकी हरपल्याची खंत व्यक्त केली. विश्व शांती प्रार्थनेने शोकसभा संपली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg